Posts

Showing posts from April, 2023

महाविद्यालयातील पहिला दिवस

 माझा महाविद्यालयातील पहिला दिवस (Maza College Madhil Pahila Divas Marathi Nibandh): आपल्यामधील सर्वांनाच महाविद्यालयांमधील शेवटचा दिवस आठवत असेल कॉलेज सोडताना मन कसे भरून येते जुने मित्र आणि त्यांच्या आठवणी सदैव आपल्या मनामध्ये घर करून राहते. कॉलेजमध्ये केलेली मौजमजा कॅंटीनचे दिवस या सर्व आठवणी मनामध्ये एकाच आणि पुन्हा ते दिवस जगावे असे वाटते. आज माझी महाविदयालयाची शेवटची परीक्षा संपली. पदवी संपादन करण्याच्या मार्गातील हा पहिला टप्पा. या महाविदयालयाशी असलेला संबंध आज संपला. अशा क्षणी आठवतो तो महाविदयालयातील पहिला दिवस. दहावीची परीक्षा मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो होतो. त्यामुळे या महाविदयालयात मला सहज प्रवेश मिळाला होता. सोळा वर्षांचा असा मी या कनिष्ठ महाविदयालयात पहिले पाऊल टाकले, तेव्हा पूर्णपणे गोंधळलेला होतो. शाळेचे सुरक्षित जग मागे पडले होते. अनेक बंधने दूर झाली होती; पण मिळालेल्या स्वातंत्र्यानेच मी जास्त भांबावलो होतो. शंभर-सव्वाशे विदयार्थ्यांचा वर्ग आणि वर्गाची रचना एखादया ऑडिटोरिअमसारखी होती. समोर व्यासपीठ, व्यासपीठावर प्राध्यापकांसाठी टेबल, खुर्ची आणि मोठा फळा. हळू...